परभणीत 35 व्यक्ती कोरोनाबाधित,2 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परभणी शहरासह जिल्ह्यात रविवारी(दि.23) दिवसभरात 35 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या असुन 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

परभणी शहरात एकूण 22, ग्रामीण भागात 1, सेलू शहरात 2, सेलू ग्रामीण 3, पालम शहरात 1, गंगाखेड ग्रामीण 1, जिंतूर ग्रामीण 1, पूर्णा शहर 3, पूर्णा ग्रामीण 1 व बीड जिल्ह्यातील धारूर येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आला.

परभणी शहरातील 79 वर्षीय वसमत रस्त्यावरील व्यक्ती मृत्यू पावली. गंगाखेड तालुक्यातील मरगळवाडी येथील 63 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला.