कर्मचाऱ्यांना धमकावून पेट्रोल मागितले, भाजपा शहराध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेवराई शहराच्या भाजपअध्यक्षाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन दमदाटी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी  हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संचारबंदी आणि जमावबंदी लागू असल्याने बाहेर फिरण्यासाठी पोलिसांकडून विशेष पास घेणे गरजेचे आहे. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांनाच हा पास देण्यात येत आहे. हा पास असल्याशिवाय कोणालाही पेट्रोल अथवा डिझेल देऊ नये अशा सूचना पोलिसांनी पेट्रोलपंप चालकांना दिल्या आहेत. शुक्रवारी म्हणजेच 10 एप्रिल रोजी दुपारी 1च्या सुमारास याह्याखान पठाण कॅप्टन कृष्णकांत पेट्रोल पंपावर आले. त्यांनी पेट्रोल भरण्यास सांगितले. यावर पेट्रोल भरणाऱ्याने त्यांच्याकडे पासची मागणी केली. पास नसल्याने पठाण यांनी पेट्रोल भरणाऱ्याला धमकवायला सुरुवात केली.

मुलगा गतिमंद, सून भोळसर; वृद्धेवर शिवसैनिकांनी केले अंत्यसंस्कार

घराच्या गच्चीवर दारू पिऊन धिंगाणा, पनवेलमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकाला बेड्या

ज्या पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला आहे तो देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील शहीद कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या कुटुंबियांना देण्यात आलेला आहे. पठाण यांच्याकडे पास बसल्याने श्रीकिसन मारोती जोंधळे यांनी पेट्रोल भरण्यास नकार दिला. यामुळे पठाण यांनी जोंधळे यांना ‘ मी पास आणला नाहीये, तू गुपचूप पेट्रोल टाक’ असं धमकावलं. याला नकार दिल्याने पठाण यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली. पेट्रोल पंपाचे मॅनेजर संभाजी मोटे यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला तर पठाण यांनी त्यांनाही शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिली ज्याच्या आधारे पठाण यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.