फीअभावी स्कूल बसचालकांचा पगारही रखडला

472
प्रातिनिधीक फोटो

शालेय शुल्काबरोबरच स्कूलबसची फीदेखील मिळत नसल्याने स्कूल बसचालक, वाहक आणि महिला मदतनीस यांचा पगारही रखडला आहे. स्कूल बसमालकांनी मार्च महिन्याचा पगार देण्यास पैसे नसल्याचे सांगून सरकारकडे कर्मचाऱयांचे पगार देण्याची मागणी केली आहे.

शाळा आणि पालकांकडून स्कूल बसची फी मिळालेली नसल्याने चालक व वाहकांचा पगार कसा द्यायचा, असा यक्षप्रश्न मालकांसमोर आहे. तूर्तास तरी मार्च महिन्याचा पगार देणे बसमालकांना शक्य नाही. त्यामुळे ज्यांना परवडत नाही त्यांनी खुशाल नोकरी सोडावी, असे मालकांकडून सांगण्यात येत आहे. सरकारनेच पगाराची तरतूद करावी, अशी मागणी होत आहे.

एप्रिल ते जूनपर्यंत फी घेण्याची परवानगी द्या

सरकारने स्कूल बसमालकांना एप्रिल ते जूनदरम्यानचे स्कूलबस भाडे किंवा फी आकारण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी स्कूल बसमालक ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या