पैसे देणं टाळण्यासाठी प्रवासी टॅक्सी चालकावर थुंकला, कोरोनामुळे मृत्यू झाला

फोटो- प्रातिनिधीक

एका टॅक्सीचालकाचा कोरोनाची लागण झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या चालकाच्या गाडीत बसून प्रवास करणारा प्रवासी चालकाच्या तोंडावर थुंकला होता. जो प्रवासी थुंकला त्याला कोरोनाची लागण झाली होती असं चालकाच्या मित्राने सांगितलं आहे. ट्रेव्हर बेल असं टॅक्सी चालकाचं नाव आहे. त्याने त्याचा मित्र डॅमिअन बिग्सला सांगितलं होतं की एक प्रवासी अवघ्या 9 पाऊंडासाठी (832 रुपये)  त्याच्यासोबत हुज्जत घालायला लागला होता. भांडत असताना भाडं न देता तो माझ्या तोंडावर थुंकून पळून गेला.

इंग्लंडमधल्या स्टॅनफोर्ड भागात हा प्रकार घडला होता. यानंतर ट्रेव्हरची प्रकृती खालावायला लागली होती. त्याला ताप यायला लागला आणि कोरोनाची लागण झाल्याचे निदानही करण्यात आले. ट्रेव्हेरला रॉयल लंडन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे त्याचा 18 मे रोजी मृत्यू झाला. ट्रेव्हरचा मित्र ब्रिग्सने सांगितले की त्याने रुग्मालयात 3 आठवडे उपचार घेतले मात्र मृत्यूला तो हरवू शकला नाही.

आर्सेनल फुटबॉल क्लबचा कट्टर समर्थक असलेल्या ट्रेव्हरचा अवघ्या 3 दिवसांपूर्वी वाढदिवस झाला होता. ईस्ट लंडन भागात राहणाऱ्या ट्रेव्हरने साठी पूर्ण केली होती. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या रक्ताचे नमुने हे कोरोनासंदर्भातील अभ्यासासाठी दान करण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या