महाराष्ट्रातील 20 मजूर तेलंगाणात अडकले, मदतीसाठी शासनाकडे याचना

537

चंद्रपूर जिल्ह्याचे रहिवासी असलेले 20 मजूर हे तेलंगाणामध्ये अडकले आहेत. या मजुरांना आसपासचे ग्रामस्थ त्यांच्या गावात भीतीने घ्यायला तयार नाहीयेत. यामुळे या मजुरांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून त्यांना प्यायला घोटभर पाणीही मिळेनासं झालं आहे. या मजुरांमध्ये महिलांचाही समावेश आहे. तेलंगाणामध्ये अनेक गावे अशी आहेत ज्यांनी स्वत:च्या वेशी बाहेरच्यांसाठी बंद करून टाकल्या आहेत. गावातील कोणी बाहेर जात नाही आणि बाहेरचं कोणी आत येत नाही अशी व्यवस्था या गावात करण्यात आली आहे. गावकऱ्यांना वाटणारी भीती स्वाभाविक आहे. मात्र त्यामुळे या मजुरांचे हाल व्हायला सुरुवात झाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचे रहिवासी असलेले 20 महिला आणि पुरूष मजूर हे तेलंगाणामध्ये मिरची तोडणीसाठी गेले आहेत. खम्मम जिल्ह्यातील कामपेला तालुक्यातल्या बारलागुंडा या गावात ते कामाला गेले आहेत. जवळपास एक महिना 22 दिवस ते इते मजुरीचं काम करण्यासाठी आले असून दुर्दैवाची बाब अशी की हे मजूर ज्या शेतमालकाच्या शेतात मिरची तोडत होते त्या मालकाने मजुरी न देताच त्यांना गावाच्या बाहेर काढले आहे. गावात आता त्यांना कोणीच घ्यायला तयार नसल्याने आणि आजूबाजूला सगळं बंद असल्याने या मजुरांपुढे वास्तव्याची आणि खाण्यापिण्याची प्रचंड मोठी समस्या निर्माण झाली आहे. या मजुरांनी एका शेतामध्ये आश्रय घेतला असून त्यांना घोटभर पाणीही मिळेनासं झालं आहे. महाराष्ट्र सरकारने तेलंगणा सरकारशी संपर्क साधावा आणि आम्हाला इथून बाहेर काढावे अशी विनंती या मजुरांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या