
ब्रिटनचे माजी सैनिक आणि कोरोना संकटात जगभरातील कोरोना योद्धय़ांच्या मदतीसाठी 320 कोटी रुपयांचा निधी जमवणारे कॅप्टन टॉम मूर यांनी मंगळवारी लंडनच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 100 वर्षीय कॅप्टन टॉम यांना नुकताच कोरोनाचा संसर्ग झाला होता. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना लंडनच्या बेडफोर्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला अशी माहिती कॅप्टन टॉम यांची कन्या हेना इंग्राम यांनी दिली. वयाच्या शंभरीतही कॅप्टन टॉम यांनी जगभरातील बागबगीच्यांत फेरफटका मारत कोरोना योद्धय़ांच्या मदतीसाठी 320 कोटी रुपयांचा निधी जमवला होता. तो निधी त्यांनी ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये जमा केला आहे. दुसऱ्या महायुद्धात अतुलनीय पराक्रम गाजवणाऱ्या टॉम यांना इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ यांनी ‘नाईटहूड’ने सन्मानित केले.


























































