कोरोना : देशात 13 पॉझिटिव्ह आग्र्यात नवे 6 रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनमधून जगभरात पाय पसरत असलेल्या कोरोना विषाणूने हिंदुस्थानातही खळबळ माजवली आहे. सोमवारी दिल्ली, जयपूर, तेलंगणा आणि केरळमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी आग्रा येथे कोरोनाचे सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. जयपूरमध्ये एक इटालियन नागरिक कोरोनाग्रस्त आढळून आला आहे. देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 13 झाली आहे.

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार देशात सहा कोरोनाग्रस्त आढळले आहेत. उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागाने आज राज्यात सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती दिली. त्यांचा चाचणी अहवाल पुण्याच्या राष्ट्रीय संसर्गजन्य आजार संशोधन संस्थेत पाठविण्यात आला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णाची मुले शिकत असलेल्या नोएडातील दोन शाळा सावधगिरी म्हणून बंद करून परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.