क्षमा करा! कोरोना कॉलर ट्यून बंद करणे माझ्या हातात नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाईलवरून कुणाशी संपर्क साधायचा असेल तर आधी बिग बि अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कोरोना काॅलर टय़ून ऐकावी लागते. ही कोरोनावाली काॅलर टय़ून कधी बंद होणार, असा सवाल अमिताभ बच्चन यांच्या एका फॅन्सने ट्विटरवर त्यांना विचारला. त्यावर उत्तर देताना अमिताभ यांनी कोरोना काॅलर टय़ून बंद करणे माझ्या हातात नाही, असे सांगत त्या फॅन्सची माफी मागितली. बिग बींचे हे उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

क्षमा त्रिपाठी नावाच्या युजरने अमिताभ बच्चन यांना म्हटले की, आम्ही तुमचा प्रामाणिकपणा आणि कन्फेशनवर प्रेम करतो. याच कारणामुळे तुम्हाला बिग बी म्हणतो. पण आता ती कोरोना काॅलर टय़ून बंद करा. त्यावर अमिताभ म्हणाले, ती काॅलर टय़ून माझा निर्णय नाही. मला सरकारने सांगितले होते की कोरोना काळात जागतिक आरोग्य संघटनेच्या कॅम्पेनसाठी काही शब्द बोला, जेणेकरून व्हिडिओसाठी ते वापरता येतील. म्हणून मी तसं केलं. आता त्यांनी त्याला काॅलर टय़ून बनवले आहे. आता मी काय करू शकतो. अमिताभ पुढे म्हणाले, मी देश, प्रांत आणि समाजासाठी जे काही करतो, ते नि:शुल्क असते. फक्त करत जातो. ‘जर तुम्हाला त्रास होत असेल तर मी क्षमा मागतो. मात्र हा विषय माझ्या हातात नाही.’