जिल्हाधिकारी कार्यालयात सोशल डिस्टंसिंगचा अनोखा उपक्रम

391

कोराना संसर्गाचा धोका लक्षात घेता गडचिरोली जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी अनोख्या उपक्रमातून सोशल डिस्टंसिंग राबविण्यास सुरूवात केली आहे. व्हीडीओ कॉलच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चौकशीकरीता आलेल्यांसाठी ही सुविधा सुरू झाली आहे. कोरोना टाळेबंदीनंतर शासनाकडून प्रवासासाठी ई-पास सुविधा सुरू करण्यात आली. प्रशासनाकडून त्याबाबत मदतीसाठी दूरध्वनी क्रमांकही देण्यात आले. तरीही नागरिक मोठया संख्येने जिल्हा कार्यालयात प्रत्यक्ष येवून चौकशी करतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ही आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आली. एखादा व्यक्ती ई-पासबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी करीता आला, तर त्याला त्याचठिकाणी ई-पास बाबत प्रत्यक्ष ऑनलाईन तपशील सांगितला जातो. यावर त्याचे समाधान झाले नाही तर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना पहिला व्हीडीओ कॉल केला जातो. याही ठिकाणी समाधान न झाल्यास निवासी उपजिल्हाधिकारी मार्गदर्शन करतात. यानंतर स्वत: जिल्हाधिकारी आवश्यकतेनूसार तिस-या टप्प्यात नागरिकांशी संवाद साधतात. अशी ही त्रिस्तरीय रचना इथं करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या