सील इमारतींमधील गणेशमूर्ती विसर्जन कंटेनमेंट झोनमध्येच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना प्रभावामुळे पालिकेने जाहीर केलेल्या मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्र आणि सील इमारतींमध्येही गणेशोत्सव साजरा होणार असला तरी या ठिकाणच्या मूर्तींचे विसर्जन कंटेनमेंट झोनबाहेर आणून करता येणार नाही. अशा ठिकाणच्या मंडळांनी मूर्तीचे विसर्जन मोठय़ा टाकीत करावे आणि घरगुती मूर्ती मोठा टप, बादलीत करावे किंवा विसर्जन पुढे ढकलावे असे निर्देश पालिकेकडून देण्यात आले आहेत.

कंटेनमेंट झोन, सील इमारतींमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यास पालिकेने बंदी घातलेली नाही. मात्र अशा ठिकाणी गणेशोत्सव साजरा करताना खबरदारीच्या सर्व उपाययोजना कठोरपणे पाळाव्यात असे निर्देश पालिकेकडून देण्यात आले आहेत.

मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना 4 फुटांची मूर्ती, घरगुती गणेशोत्सवात दोन फुटी, शाडूची मूर्ती आणावी असे नियम घालून देण्यात आले आहे. शिवाय आगमन-विसर्जनाची मिरवणूक काढू नये, वारंवार निर्जंतुकीकरण करावे, मोठे कार्यक्रम आयोजित करू नयेत

आतापर्यंत केवळ 721 अर्ज

यावर्षी कोरोनाच्या प्रभावामुळे मंडळांकडून परवानगीसाठी कमी प्रतिसाद मिळत आहे. 20 जुलैपासून ही प्रक्रिया सुरू झाली असताना पालिकेकडे 30 ऑगस्टपर्यंत केवळ 761 अर्ज आले आहेत. यातील 306 मंडळांना पालिकेकडून आतापर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तर नियमांची पूर्तता न करणारे 39 अर्ज पालिकेकडून फेटाळण्यात आले आहेत. तर 291 अर्जांना परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, मुंबईत सुमारे बारा हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून यातील 2 हजार 700 मंडळे मोकळ्या जागेत, रस्त्याच्या बाजूला मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करतात.