कोरोना रोखण्यात दक्षिण मुंबई आघाडीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असताना कोरोनाला रोखण्यात दक्षिण मुंबई आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. यामध्ये ‘सी’ वॉर्ड मरीन लाइन्समध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी सर्वाधिक 744 दिवसांवर पोहोचला असून ‘बी’ वॉर्ड सँडहर्स्ट रोड 564 दिवस, ‘जी’ दक्षिण वरळीत 553, ‘ए’ विभाग कुलाबा 412 दिवस आणि ग्रँट रोडमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी 500 दिवसांवर पोहोचला आहे.

पालिकेच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. यामध्ये होणाऱया चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळणाऱया रुग्णांचे प्रमाणही घटले आहे. मार्चमध्ये कोरोनाने मुंबईत शिरकाव केल्यानंतर होणाऱया चाचण्यांत पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण तब्बल 35 टक्क्यांपर्यंत होते. मात्र सद्यस्थितीत हे प्रमाण 4 टक्क्यांवर आले असून पॉझिटिव्ह आढळणाऱया रुग्णांमध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांची टक्केवारी 80 टक्क्यांहून जास्त झाली आहे. यामुळे रुग्ण पॉझिटिव्ह आढळत असले तरी त्यांना पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येणाऱया रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. कोरोना रोखण्यात ही सर्व स्थिती अनुकूल ठरत असल्याने रुग्ण दुपटीचा वेगही झपाटय़ाने वाढत आहे. तर कोविड वाढीचा दरही 0.21 टक्क्यांवर आला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 93 टक्क्यांवर पोहोचले आहे. मुंबईत सद्यस्थितीत रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी 332 दिवसांवर गेला असून एकेकाळी ‘हॉटस्पॉट’ असलेले दक्षिण मुंबईतील प्रभाग आता कोरोनामुक्त होऊ लागले आहेत.

भायखळा, दादर, परळमध्येही स्थिती सुधारली

दरम्यान, ई प्रभाग भायखळा, जी उत्तर दादर आणि एफ दक्षिण परळ विभागातही कोरोना चांगलाच आटोक्यात आला आहे. भायखळामध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी 538, परळमध्ये 521 आणि दादर-धारावीत रुग्ण दुपटीचा कालावधी 492 दिवसांवर पोहोचला आहे. या प्रभागात रुग्ण सरासरी रुग्णवाढही खाली आली असून अनुक्रमे 0.31, 0.14 आणि 0.13 इतकी नोंदवली गेली आहे.

धारावीत फक्त 12 ऑक्टिव्ह रुग्ण

  • आशियातील सर्वात मोठी आणि दाटीवाटीच्या धारावी झोपडपट्टीत सध्या केवळ 12 ऑक्टिव्ह रुग्ण राहिले आहेत. या ठिकाणी सर्वाधिक रुग्णवाढ होत असताना पालिकेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र या ठिकाणी आतापर्यंत 3 हजार 3439 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
  • दादर, माहीम आणि धारावीचा समावेश असलेल्या जी उत्तर विभागात आतापर्यंत 12959 रुग्ण आढळले असून 11 हजार 950 जणांनी कोरोनावर मात केली आहे. या संपूर्ण विभागात 380 ऑक्टिव्ह रुग्ण आहेत.
    नॅशनल पार्प पुन्हा खुले