ओटीटीवर ठरतायत यशाची गणितं; सिनेमांच्या सिल्व्हर, गोल्डन ज्युबलीचा जमाना गेला…

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील किस्से, जुन्या आठवणी ते चाहत्यांसोबत शेअर करतात. नुकताच त्यांनी बॉलीवूडच्या चित्रपटांच्या यशाचा नवा फॉर्म्युला सांगितला आहे. सत्तरच्या दशकात चित्रपट 50 आणि 100 आठवडे चालायचे. आता चित्रपटांच्या यशाची गणित ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ह्यूज ठरवतात, असं त्यांनी म्हटलं आहे.

अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय, ‘सत्तरच्या दशकात आणि त्यापुढील काही वर्षांत चित्रपट 50 आठवडे, 100 आठवडे बिझनेस करायचे. डॉन, कसमे वादे, त्रिशुल, मुकद्दर का सिकंदर, गंगा की सौगंध हे माझे सहा ते सात चित्रपट एकाच वर्षी प्रदर्शित झाले. जवळपास सगळ्याच चित्रपटांचे शो 50 आठवडय़ांहून अधिक काळ थिएटरवर चालले… आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर मिलियन्स चित्रपटाच्या यशाचा आलेख ठरवतात. अमिताभ बच्चन यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

‘अजूबा’ची 30 वर्षे!

‘अजुबा’ या चित्रपटाला 30 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने बिग बी यांनी परवाच या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत सहकलाकार ऋषी कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. ‘अजुबा’ची 30 वर्षे सरली… काही सुखाची तर काही दुःखाची. सोबती तर निघून गेले…आठवणी मात्र राहिल्या, असे त्यांनी म्हटले होते.

आपली प्रतिक्रिया द्या