सोने लकाकले @45 हजार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सराफ बाजार उघडताच आज सोन्याच्या भावाने किंमतीचा नवा इतिहास रचला. सोने आज प्रतितोळा तब्बल 45,510 एवढय़ा सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. सोन्याबरोबरच चांदीचेही दर वाढले आहेत. जगभरात धुमाकूळ घालत असलेला कोरोना व्हायरस, शेअर बाजारातील घसरण यामुळे खरेदीदारांनी आपला मोर्चा सोने खरेदीकडे वळवल्यामुळे आणि लग>सराईच्या वाढलेल्या मागणीमुळे सोन्या-चांदीच्या किमतीत ही वाढ झाली आहे. वाढीव मागणी कायम राहिल्यास सोन्याचा दर 46 हजाराच्या वर जाऊ शकतो.

शुक्रवारी सराफ बाजार उघडताच सोन्याचा दर 44,500 रुपयांच्या आसपास होता. दुपारच्या सुमारासह सोन्याचा भाक 45 हजारांच्या पार गेला. दिल्ली सराफा बाजारामध्ये सोन्याचा दर प्रतितोळ्यामागे 910 रुपयांनी, तर चांदीचा दर प्रतिकिलोमागे 700 रुपयांनी वाढला आहे. गुरुवारी सोन्याचा दर 100 रुपयांनी घसरला होता. येस बँकेकर निर्बंध घालण्यात आल्याने शेअर बाजार 800 पेक्षा जास्त अंकांनी कोसळला. यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याकडे आपला मोर्चा वळबला. त्यामुळे सोन्याचा दर 10 ग्राममागे 45,510 रुपये झाला आहे, तर चांदीचा दरही प्रतिकिलोमागे 48180 रुपयांवर स्थिरावला आहे. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही गुंतवणूकदारांचा कल सोने खरेदीकडे वळलेला आहे.