बीडकरांच्या मदतीला बारामती ऍग्रोकडून बीड जिल्ह्याला 600 लिटर मोफत सॅनिटायझर

495
rohit-pawar-new

बीड जिल्ह्याच्या मदतीला पुन्हा एकदा बारामती धावून आली असून जामखेडचे आमदार  रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो मार्फत जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला 600 लिटर सॅनिटायझर मोफत देण्यात आले आहे.

सोमवारी बारामती ऍग्रोच्या वतीने बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याकडे हे 600 लिटर सॅनिटायझर सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर मुंडे यांनी आमदार रोहित पवार व  पवार कुटुंबियांचे आभार मानले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सध्या सॅनिटायझर्स चा तुटवडा आहे. याचा विचार करून बारामती ऍग्रो समूह पुढे येऊन सॅनिटायझर निर्मिती करत आहेत. बीड जिल्ह्यातील सॅनिटायझरची निकड लक्षात घेता बारामती ऍग्रो कडून बीड जिल्हा आरोग्य यंत्रणेला सॅनिटायझर देण्याबाबत आ. रोहित पवारांकडे विनंती केली होती. या विनंतीला पवारांनी लागलीच सकारात्मक प्रतिसाद दिला. मागील वर्षीच्या भीषण दुष्काळातही रोहित पवारांनी बारामती ऍग्रोच्या वतीने जिल्ह्यात टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा केला होता.


 

आपली प्रतिक्रिया द्या