संचारबंदचा फायदा घेत दारू विक्री; दोन ठिकाणी पोलीसाच्या धाडी

832

कोरोना संसर्ग  वाढू नये म्हणून हिंदुस्थानात बंद दरम्यान अवैद्य देशी दारु जोमात विक्री करताना दोन ठिकाणी धाड टाकण्यात आली. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे दुपारी  12 वाजेच्या सुमारास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून सर्व हिंदुस्थानासह जिल्हा बंद आहे. अशाच अवैद्य देशी दारु विक्री होत असल्याचे एका खबऱ्या मार्फत बदनापूर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पुजा पाटील याना मिळताच त्यांनी तात्काळ धाड टाकून अवैद्य देशी विक्री करणाऱ्याला अटक केली. आरोपी शारदा रामा पवार याच्याकडे देशी दारुच्या 60 बॉटल अंदाजे किंमत 3300 रुपये व राजेवाडी शिवारातील आरोपी शारदाबाई लक्ष्मण पवार यांच्या कडे 16 देशी बॉटल अंदाजे 880 रुपये किंमत जपत करण्यात आले आहे. फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक पुजा पाटील यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या