परिचारक यांना दमबाजी करणाऱ्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

1196
crime

करोना संदर्भामध्ये वैद्यकीय माहिती घेण्यासाठी गेलेल्या परीचालकाना दमदाटी, शिवीगाळ करून त्यांच्याकडे असलेले कागदपत्र हिसकावून घेण्याचा प्रकार केल्याप्रकरणी येथील कॅम्प पोलीस ठाण्यांमध्ये तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींमध्ये सलीम अकबर शेख राहणार मुकुंदनगर, रफिक शेख, रिझवान शेख तिघे राहणार मुकुंदनगर यांचा यामध्ये समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी नगर शहरामध्ये दोन करोना रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन मुकुंदनगर परिसरामध्ये राहणाऱ्या वस्तीमध्ये संबंधित व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीनुसार याठिकाणी आज आरोग्य विभागाला माहिती घेण्यास सांगितले होते. सोमवारी मुकुंदनगर भागांमध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच परिचारिका या संबंधित वरील आरोपींच्या घरी गेले असता त्यांना त्या ठिकाणी नाव पत्ता विचारण्यात आला आम्ही आरोग्य भागातून आलो आहोत असे सांगितले या वेळेला त्यांच्यामध्ये चांगलीच शाब्दिक चकमक घडली तुम्ही आमचे नाव काय घेतले कशाला घेतली अशी विचारणा या आरोपींनी केली तसेच त्या परिचारकांच्या कडील असलेले रजिस्टर हिसकावून घेण्याचा सुद्धा प्रयत्न झाला, तसेच त्यांच्याकडे असलेले ओळखपत्र पण काढून घेण्याचा प्रकार घडला व त्यांना या भागामध्ये परत येऊ नका अशी दमबाजी पण करण्यात आली सदर प्रकारानंतर तात्काळ या परिचारिकानी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली.

या प्रकरणांमध्ये परिचारिका मनीषा साठे व सुनिता चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा कॅम्प पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कुमार शिंदे हे करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या