संचारबंदीत फिरणे तिघांना भोवले, तीन दिवसांची कैद

1237

कोरोनामुळे संचारबंदी असताना विनाकारण फिरणाऱ्या तिघांना भोवले आहे. त्यातील पहिली शिक्षा बारामतीत न्यायालयाने दिली असून, बाहेर फिरणाऱ्या तिघांना न्यायालयाने 500 रुपये दंड किंवा तीन दिवस कैद अशी शिक्षा सुनावली आहे. संचारबंदीचा आदेश मोडल्यानंतर किमान सहा महिने कैदेची शिक्षा होऊ शकते. अफजल बनिमिया अत्तार, चंद्रकुमार जयमंगल शहा आणि अक्षय चंद्रकांत शहा अशी शिक्षा झालेल्याची नावे आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांना बाहेर फिरण्यास बंदी असून, वाहने देखील रस्त्यावर अण्यास बंदी घातली आहे. मात्र तरीही काही जण विनाकारण बाहेर फिरत असताना दिसून आले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून त्यांच्यावर 188 नुसार कारवाईकरून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. बारामती तालुका पोलीसांनी देखील अनेकांवर कारवाई केली आहे. त्यानुसार या तिघांवर बारामती तालुका पोलिस ठाण्यात तिघांवर खटले भरण्यात आले होते. त्या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याना 3 दिवसांची साधी कैद आणि 500 रुपये दंड भरण्याची शिक्षा दिली आहे.

राज्यातील संचारबंदीचा आदेश न पाळल्याबाबत ही पहिली शिक्षा असून यामुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, न्यायालयाने दिलेली 3 दिवस कैद किवां 500 रूपयांची ही शिक्षा कोणालाही कमी वाटत असेल. पण त्याचे परिणाम मोठे असून, भविष्यात अडचणीची ठरणार आहे. शिक्षा लागल्यानंतर तुमच्या नावावर त्याची नोंद झाली आहे. त्यामुळे पोलिसांचे चारित्र्य पडताळणी करताना अडचण येईल. तुम्हाला शासकीय नोकरी मिळू शकणार नाही. तर, पासपोर्ट, शस्त्र परवाना, व्यवसाय परवाने मिळताना अडचण येणार आहे. त्यामुळे याचा सर्वांनी गंभीर विचार करण्याची गरज आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरून पोलिसांचे काम वाढवू नये तसेच स्वतःचे करियर धोक्यात येईल असे करू नये असे आवाहन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या