
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला शहरातील प्रसिद्ध रांगोळी कलाकार राजेंद्र वाळके यांनी अभिवादन रांगोळी रेखाटली आहे. कोरोना यास संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउनची स्थिती आहे. त्यामुळे 14 एप्रिल रोजी असलेली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरात राहूनच साजरी करायची आहे.
त्यामुळे राजेंद्र वाळके यांनी आपल्या घरीच ही भव्य रांगोळी रेखाटली आहे. ग्रंथामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र त्या तैलचित्रासमोर सोशल डिस्टसिंग राखत अभ्यास करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत असल्याचे रांगोळीत दाखविण्यात आले आहेत व या रांगोळीत अभ्यास, ज्ञान, वाचन व लेखन,हेच खरे महामानावास अभिवादन असा आशयाचे शब्द वापरले आहेत. रांगोळीच्या खाली Stay Home, Stay Safe असा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संदेशही देण्यात आला आहे.

































































