शिवसेना नगरसेवकाचा मदतयज्ञ; वाटले दहा हजार मास्क, सॅॅनिटायजर,जंतुनाशके

593

शिवसेना नगरसेवक तुषार बेंबळकर यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार कोरोनाच्या विरोधात नागरिकांचे बचाव करण्यासाठी रमेशवाडी, गणेशनगर परिसरातून सुरवात करत बदलापुरातील सुमारे दहा हजार घरात स्वखर्चाने दहा हजार मास्क आणि पाच हजार सॅॅनिटायजरच्या बाटल्या तसेच इमारत सूरक्षित ठेवण्यासाठी 10 लिटरची जंतुनाशक प्रत्येक सोसायटीला देण्याचे महत्वाचे काम केले आहे. तसेच महिला रिक्षाचालक तसेच पोलीस यांना देखील मास्क, सॅॅनिटायजर घरोघरी जाऊन देण्यात आले आहेत.तसेच परिचारिकांच्या सेवेला अभिवादन करत त्यांना सप्रेम भेट वस्तू देत त्यांचे मनोधेर्य वाढविण्याचे काम नगरसेवक तुषार बेंबळकर यांनी केले आहे. या बिकट काळात गरजूंना महिनाभराचे रेशनीग देण्याचे कामही करत असल्याचे तुषार बेंबळकर यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या