
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घेत जावे अशी आपल्याकडे एक म्हण आहे. दानत्व आणि दातृत्व काय असते ते बीडमध्ये पाहाण्यास मिळाले. संकट कोणतेही असो. प्रत्येक संकटात मदतीचा हात देण्यासाठी धाऊन येणारं हक्काचं एक कुटुंब आहे. हे कुटुंब राजयोग प्रतिष्ठाणच्या माध्यमातून समाजाचे अश्रू पुसण्याचे काम करत असते. प्रतिष्ठाणचे नाव राजयोग असले तरी माणसेही राजयोग सारखेच आहेत. गरिबीत कधी लाजले नाहीत आणि श्रीमंतीत कधी माजले नाहीत असे दिलीप धूत यांचे कुटुंब होय. या कुटुंबाकडून मदतीचा ओघ बारा महिने चोवीस तास सुरू असतो. उपक्रम कोणताही असो धूत परिवाराकडे मदतीसाठी गेलेला विन्मुख होऊन कधीच परत येत नाही. राजयोगाला साजेसे विचार, राजयोगाला साजेसे वर्तन, श्रीमंती कितीही असली तरी नेहमी रमले मात्र गरिबांमध्ये दिलीप धूत यांच्या विचारांचा वारसा त्यांचा मुलगा शुभम धूत पुढे चालवत आहेत. आजच्या तरूणांमध्ये वडिलांविषयीचा आदर, जिव्हाळा, वडिलांचा सन्मान फारसा दिसत नाही. मात्र भाऊंचा प्रत्येक शब्द शुभमसाठी आदेश असतो. शुभम जे काही करेल ते चांगलेच असेल हाच विश्वास शुभमच्या वर्तनाने निर्माण केला आहे. वडिल दिलीप धूत असोत की मुलगा शुभम धूत दोघेही बीड जिल्ह्यातले अजात शत्रू, बारा महिने समाजसेवेच्या मोडमध्ये मग बीड जिल्ह्यातील भीषण दुष्काळ असो, दुष्काळामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची व्यथा असो, वादळी वाNयाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान असो की अनाथ कुटुंबाच्या मुलांना शिक्षणासाठी सुविधा असो, दिलीप धूत आणि शुभम धूत मदतीसाठी कायम तत्पर असतात. या हाताची खबर त्या हाताला न लागणारं दान त्यांच्या हातून होत असतं. सकाळपासून मित्र परिवारांचा राबता, सगळ्यांच्या सेवेत सदैव तत्पर असं हे आगळंवेगळं कुटुंब बीड जिल्ह्यातील प्रत्येकांच्या मनामध्ये घर करून राहिलं आहे.
कोरोनाच्या भीषण संकटात हळव्या मनाचं असलेलं हे कुटुंब स्वस्थ कसे बसेल. बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या या संकटामध्ये अडचणीत असलेल्या हजारो कुटुंबांना मदत करण्याचे काम अनेक दानशुर व्यक्तींनी केले. बीड जिल्ह्यामध्ये कोणी उपाशी राहणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घेतली. अन्नछत्र उभारले, घरपोच डबे पोहच केले, बीड जिल्ह्यात माणुसकी जिवंत असल्याचे दर्शन कोरोनाच्या संकटामध्ये दिसून आले. या सगळ्या संकटामध्ये लक्षात राहिली ती धूत परिवाराची धावपळ आणि लगबग दिलीप धूत आणि शुभम धूत या पिता-पुत्रानी अडीच महिन्याच्या कालावधीत पाच हजार लोकांना जगवण्याचे काम केले. जात ना धर्म, वाडी ना वस्ती, शहर न गाव काही पाहिले नाही. सकाळपासून मदतीचा महायज्ञ शुभम धूत यांचा सुरू होता. रोज नविन गाव, नविन वस्ती, नविन लोक, अडचणी त्याच डोळ्यासमोर ठेऊन त्यांच्या मदतीचे हे कार्य अविरत चालू होते.
कोरोनाचा विळखा वाढत असताना लॉकडाऊनला सुरूवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाच्या विरोधात लढण्याची प्रेरणा देत होते. त्यांच्या आवाहनाला आणि त्यांच्या भावनेला साद घालून बीडमधील शुभम दिलीप धूत यांच्यातील शिवसैनिक जागा झाला. मदतयज्ञासाठी रस्त्यावर उतरला. गोरगरीब, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या आणि निराधार नागरिकांच्या मदतीसाठी राजयोग फाऊंडेशनच्या माध्यमातून वंचित घटकांना मदतकार्य सुरू केले. राजयोग फाऊंडेशनचे संस्थापक तथा पर्यटन विकास महामंडळाचे माजी सदस्य दिलीप धूत यांनी मुलाच्या या समाजकार्याला बळ दिले. केवळ बीड शहरापुरते नव्हे तर 150 गावामधील अडचणीमध्ये आणि चिंतेमध्ये असणाऱ्या कुटुंबांना थेट जीवनावश्यक वस्तुंच्या किट देऊन मदत केली. शहरातील विविध भागासह वस्त्या, वाडी आणि आश्रमात राहणारी गरीब कुटुंब, पालावर वास्तव्यास असणारी शेकडो कुटुंब या मदतीमुळे जीवन जगू लागली. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे कामही धूत परिवाराने घेतले. मास्त, सॅनिटायझर देऊन या उपक्रमाला त्यांनी सुरूवात केली. पुढे गावा गावात जाऊन तब्बल पाच हजार कुटुंबांना अन्नधान्य आणि किराणा सामानाचे वाटप पोहच केले. शेकडो सामाजिक संस्थांना आधार दिला. ज्या संस्थेमध्ये समाजकार्य चालू असते. त्या संस्थांनाच बळ देण्याचे काम शुभम धूत यांनी केले. मग इन्पंâट आश्रम असो, आदिवासी समिकरण असो की सर्पराज्ञी प्रकल्प असो अशा असंख्य आश्रमांना त्यांनी मदतीचा हात दिला. बीडजवळील आरोग्यधाम, कामधेनू, हत्तीखाना भागातील कृष्णमंदिर, महानुभव पंथाचे आश्रम, शांतीवन, कम्युनिटी किचन, एकल महिला संघटन, निराधार विधवा महिला या संस्थांना धूत यांची मिळालेली मदत लाख मोलाचे ठरली. धूत परिवाराने बीडमधील स्मशानभूमीमधील, कब्रस्थानातील चर्च येथील कुटुंबांना मदतीचा हात दिला. वासुदेव समाजातील कुटुंब असो की नाभिक समाजातील कामगार, भटक्या विमुक्त समाजातील गरजू, घरकाम करणाऱ्या महिला, परिट समाजातील गरजू कुटुंब, उपेक्षित असणाऱ्या लोहार समाजातील श्रमिक कामगार, मुस्लिम समाजातील निराधार, विंधवा महिला, रिक्षा चालक, अॅटो चालक, सर्पमित्र, निराधार, अपंग सुतार समाजातील गरजू, ढोल ताशा हलगीवादक असे असंख्य उपेक्षित वर्ग धूत परिवाराच्या मदतीसाठी डोळे लाऊन बसले होते आणि या सर्व घटकांना, उपेक्षित वर्गाना अडीच महिने जगवण्याचे आणि हसत खेळत ठेवण्याचे काम धूत परिवाराने केले.
प्रेरणाच शिवसेनाप्रमुखांची

शिवसेनाप्रमुखांच्या जाज्वल विचाराने प्रेरित झालेले दिलीप धूत कोणत्याही पक्षात असले तरी नेहमीच मनात आणि डोक्यात होती ती फक्त शिवसेना, शिवसेनेविषयी कायम आदर आणि सन्मान राखण्याचे काम दिलीप धूत यांनी केले. शिवसेनाप्रमुखांच्या ज्वलंत विचाराने प्रभावित झालेले दिलीप धूत समाजासाठी नेहमीच रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी दिलेली शिकवण धूत परिवारासाठी दिशादर्शक ठरली. साहेबांवर आणि शिवसेनेवर नितांत प्रेम मनात बाळगून गोरगरीब समाजासाठी हे कुटुंब नेहमीच मदतीसाठी धावून गेले आहेत.
राम नवमी ते रमजान ईद

कोरोनाच्या या संकटात भयभीत झालेल्या नागरिकांना आधार देण्याचे काम शुभम धूत यांनी केले. रामनवमीच्या दिवशी सुरू झालेला त्यांच्या मदतीचा हा यज्ञ रमजान ईदपर्यंत सुरू होता. रमजान ईदच्या दिवशी 300 मुस्लिम कुटुंबांना शिरखुम्र्याचे साहित्य वाटप करून मुस्लिम समाजाविषयी असलेला आपला आदर व्यक्त केला. सर्व समाजातील घटकांना आनंदी ठेवण्याचे , त्यांचे अश्रू पुसण्याचे काम धूत परिवाराने केले.
स्मशानभूमी ते कब्रस्थान

जेव्हा जगाचा निरोप घेण्याची वेळ येते त्यावेळचं एकमेव ठिकाण असतं ते म्हणजे स्मशानभूमी आणि कब्रस्थान, लॉकडाऊनच्या या काळात स्मशानभूमी, कब्रस्थान, ग्रेवयार्ड या ठिकाणीही वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबांना जगवणे गरजेचे होते आणि त्यांना जगवण्याचे धनुष्य धूत परिवाराने पेलले. राजयोग फाऊंडेशनच्या माध्यमातून मोंढा रोडवरील अमरधाम, संत भगवान बाबा प्रतिष्ठाणजवळील स्मशानभूमी, अंकुशनगर मधील स्मशानभूमी, तकीया मस्जिद कब्रस्थान, शहेंशाहवली दर्गा कब्रस्थान, बालेपीर दर्गाह कब्रस्थान येथील देखभाल करणाऱ्या आणि खोदकाम करणाऱ्या कुटुंबांना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप केले गेले.
फोन येताच थेट मदत

बीडच्या हत्तीखाना भागात महानुभव पंथाचे श्रीकृष्ण मंदिर आहे. तेथे वास्तव्यास असणारे भक्तगण अडचणीत आले आहेत. त्यांना धान्य पुरवठा करणे आवश्यक आहे असा फोन दिलीप धूत यांना थेट वृंदावरवरून शाम वर्मा यांचा आला. अवघ्या अध्र्या तासात दोन महिने पुरेल एवढी मदत श्रीकृष्ण मंदिरामध्ये पोहच झाली. केवळ अन्नधान्य नव्हे तर जीवनावश्यक वस्तू, किराणा सामानसह हापूस आणि देवगड आंब्याच्या पेट्या देखील कृष्ण मंदिरात पोहच करण्याचे काम शुभम धूत यांनी केले. अशीच मदत कामधेनू आरोग्यधाममध्ये पोहचविण्यात आले. आरोग्यधाममध्ये भाकड गार्इंची मोकळी गोशाळा आहे. त्याच ठिकाणी जनावरांसाठी छावणीही उभारण्यात आली. श्रीनिवास कुलकर्णी हे गोधन जगवतात, सांभाळतात मात्र या संकटात श्रीनिवास कुलकर्णीही हताश झाले. कामधेनूमध्ये मदत देणे गरजेचे असल्याचे कळताच दिलीप धूत कामधेनूमध्ये पोहचले. जनावरांच्या चाऱ्यासह तेथे वास्तव्यास असणाऱ्या वृद्ध मंडळींना मायेचा आधार देण्याचे काम धूत परिवाराने केले.
आश्रमांना ’धूत’ यांचा आधार

शिरूर तालुक्यातील आर्मी येथे सुरेश राजहंस हा तरूण अनाथ मुले सांभाळण्याचे काम करतो. त्याच्या सेवाश्रमामध्ये शंभरपेक्षा जास्त अनाथ मुले मायेची उब अनुभवत आहेत. त्या सेवाश्रमाला मदत करण्याची सुचना केली गेली. माहिती मिळताच शुभम धूत यांनी सुरेश राजहंस यांच्या सेवाश्रमातील लेकरांना घास भरवण्याचे काम केले. याच आश्रमात तमाशा कलावंतांच्या लेकरां सांभाळही केला जातो. तेथे मदत पोहचविण्याचे काम झाले. एवढेच काय दत्ता बारगजे यांच्या समाजकार्यासाठी सुधीर भोसलेच्या आदिवासी समिकरण येथील पारधी मुलांसाठी मदत पोहचविण्याचे काम केले गेले.
गहिवरले.. डोळे पाणावले!

कोरोनाने सगळे काही बदलून टाकले, लॉकडाऊनने बरेच काही शिकवले. या अशा संकटामध्ये माणूस जगणे महत्वाचे होते. अचानक घरी बसावे लागले. आठ-दहा दिवस पुरेल एवढच अन्नधान्य घरामध्ये शिल्लक होते. पुन्हा काय खायचे ही भ्रांत होती, चिंता आणि काळजीने शेकडो कुटुंब मनाने तुटत होते अशा गंभीर आणि भीषण परिस्थितीत आम्ही आहोत, काळजी करू नका असे म्हणत मदतीसाठी बाहेर पडलेले दिलीप धूत, शुभम धूत जेव्हा मदत पोहच करत होते तेव्हा शेकडो कुटुंब गहिवरत होते, त्यांचे डोळे पाणावत होते. काय आयुष्य वाट्याला आले आहे. त्याच्या वेदना ते सहन करत होते.
कोण आहेत दिलीप धूत?
1985 पासून शिवसेनेची आणि भगव्याची नाळ जुळलेले दिलीप धूत शिवसेनेच्या विद्यार्थी आघाडीचे 20 वर्षे जिल्हाध्यक्ष होते. युतीच्या काळात पर्यटन विकास महामंडळाचे चार वर्षे संचालक होते. शिवसेनेच्या पहिल्या महिला बीड नगर पालिकेच्या नगराध्यक्षा म्हणून त्यांच्या पत्नी स्मिताताई दिलीप धूत विराजमान झाल्या. त्यांचा नगराध्यक्षांचा कार्यकाळ बीड शहरासाठी दिशादर्शक ठरला. राजयोग फाऊंडेशनचे दिलीप धूत संस्थापक आहेत. त्यांचा मुलगा शुभम धूत या फाऊंडेशनचे सध्या अध्यक्ष आहेत. शिवाय शिवसेनेचे नगरसेवक म्हणूनही नियुक्त केले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संयमी, शांत, भूमिकेने प्रभावित होऊन ते शिवसेनेमध्ये ताकदीने सक्रिय झाले आहेत.


































































