डोंबिवलीतील लग्न सोहळे अधिकाऱ्यांना पडले महागात; प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे तडकाफडकी निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी डोंबिवलीत सर्व कार्यक्रमाना बंदी घालण्याचे आदेश असतानाही 19 मार्च रोजी दोन लग्न सोहळे दणक्यात साजरे झाले. याच सोहळ्यात एक कोरोनाबधित संशयित तरुण सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती. पालिका अधिकाऱ्यांनी हे सोहळे रोखण्यासाठी कांहीच हालचाल घेतली नसल्याचा ठपका ठेवून मंगळवारी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ‘ह’ प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांना तडकाफडकी निलंबित केले.

कोरोना रोगाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 13 मार्चपासून लागू झाला आहे. शिवाय नारगरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जीवनावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद केली आहेत. शिवाय सर्व शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा विषयक कार्यक्रम यांना बंदी घातली आहे. मात्र असे असतांनाही डोंबिवलीतील मोठागाव येथे 19 मार्च रोजी दोन लग्न समारंभ पार पडले. ह प्रभागक्षेत्र अधिकारी म्हणन भागाजी भांगरे यांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून हे लग्न समारंभ रोखणे गरजेचे होते. मात्र जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केल्याने लग्न समारंभांना गर्दी होऊन साथरोग पसरण्याचा धोका निर्माण झाला. याची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी भांगरे यांना आज निलंबित केले.