
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात भाजी पाल्याच्या नावाखाली बोलेरो गाडीतून संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथून अकोला येथे अवैधरीत्या पिकअप गाडीतुन चालक व मालक यांच्या सह 11 प्रवाशी घेऊन जातं असताना पारध पोलिसांनी पकडले असून त्यांचाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आन्वा ते जळगांव सपकाळ या कच्चा चोर रस्त्याने बोलेरो पिकॅप गाडीतून काही महिला व पुरुष मोठ्या संख्येने जात होते. या वेळी पारध पोलीस ठाण्याचे स पो नि शंकर शिंदे, पोलीस नाईक प्रकाश सिनकर, गोपनीय शाखेचे सुरेश पडोल यांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने बोलेरो हे वाहन जप्त करून चालक शेख आरेफ शेख सलीम, गाडी मालक शेख मसूद शेख रजमोहोमद हे दोघेही रा. आन्वा ता. भोकरदन यांच्याविरुद्ध पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या वाहनात 4 महिला व 5 पुरुष असे 9 जण मिळून आले.


































































