‘मल्लखांब कट्टा’उपक्रमाला दणदणीत प्रतिसाद

154

कोरोना व लॉकडाऊनमुळे सर्व खेळांच्या ऑनलाइन मार्गदर्शन शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. याच पार्श्वभूमीवर विलेपार्ले येथील श्री पार्लेश्वर व्यायामशाळेकडून यावेळी यूटय़ूबवर आयोजित करण्यात आलेल्या ‘मल्लखांब कट्टा’ या ऑनलाइन मार्गदर्शन सेशनलाही दणदणीत प्रतिसाद लाभत आहे. आतापर्यंत साडेपाचशेच्या वर व्यक्तींनी या उपक्रमाला सबस्क्राईब केले असून साडेपाच हजारांपेक्षा व्यक्तींनी हा कार्यक्रम बघितला आहे हे विशेष.

मार्च महिन्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्यानंतर या व्यायामशाळेचे प्रमुख प्रशिक्षक गणेश देवरूखकर यांनी येथील खेळाडूंना फिटनेस व शारीरिक शिक्षणाचे मार्गदर्शन मिळावे यासाठी ऑनलाइन सेशनचा मार्ग अवलंबला. यादरम्यान फोटो व व्हिडीओद्वारे खेळाडूंना टिप्स देण्यात येत होत्या. या सेशनमध्ये उदय देशपांडे, श्रेयस म्हसकर, दत्ताराम दुदम, शांताराम जोशी, सुजित शेडगे, डॉ. रमेश इंदोलिया या दिग्गज व्यक्तींकडून खेळाडूंना मल्लखांबाबाबत मार्गदर्शन मिळाले.

फेसबुक व सोशल साईटवर हे ऑनलाइन सेशन पाहून मला देशभरातून फोन येऊ लागले. हा कार्यक्रम मराठीसह हिंदी, इंग्रजी भाषांमधून आयोजित करण्यात यावा अशी मागणी होऊ लागली. ऑनलाइन सेशन करताना मोबाईल रेंजचा अडथळा येत होता. त्यामुळे काही लोकांपर्यंत हे प्रशिक्षण अर्धवट पोहोचत होते. यावर उपाय म्हणून यूटय़ूबवर ‘मल्लखांब कट्टा’ सुरू करण्यात आला. हा उपक्रम महिन्याच्या दुसऱया व चौथ्या रविवारी संध्याकाळी पार पडतो. यामध्ये मान्यवर व्यक्तींना बोलवून मल्लखांब, शारीरिक फिटनेस, युवकांचा आहार, मानसशास्त्रज्ञ यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाते. हा उपक्रम यशस्वी होण्यात महेश अटाळे या माझ्या गुरूंचा मोलाचा वाटा आहे, असे गणेश देवरूखकर यावेळी आवर्जून सांगतात

आपली प्रतिक्रिया द्या