पोलिसांनी केली नागरीकांना मदत; सुमारे 200 घरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर येथील मुकुंदनगर आणि परिसरातील नागरीकांची मोठी गैसरसोय निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी यावर नियोजन करत या ठिकाणाची माहिती घेऊन जवळपास आज 200 कुटुंबांना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप केले आहे. भविष्यात याच धरतीवर मदत कार्य सुरु राहणार असुन आलमगिरी या ठिकाणीही मतद कार्य सुर करण्यात येणार आहे. सध्या मुकुंदनगर येथे वाटप सुरु असून कोणावरही उपासमारीची वेळ येणार नाही यासाठी जोरदार प्रयत्न सुरु करण्यात आले आहे.

सध्या सुरु असलेले मदतकार्य हे पोलिस प्रशासन करत असून यामधून कोणालाही उपामारीची वेळ येवू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्वांना जिवनावश्यक वस्तु मिळाव्यात यासाठी प्रगतीपथावर काम काज सुरु आहे. गरजवंतानाही पहिल्यांदा वाटप करण्यात येत आहे.

सदरची मदत पोलिस अधिक्षक अखिलेशकुमार सिहं, उपअधिक्षक सागर पाटील, शहर विभागाचे संदिप मिटके, भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक पाटील यांच्या उपस्थित करण्यात आले.