‘गं… सहाजणी… काळजीपूर्वक काहीतरी सांगताहेत!

‘आपल्याला बाहेर पडायलाच हवं. नुसतं घरातून नव्हे तर या संकटातूनसुद्धा… काळजीपूर्वक!’ असा संदेश सहा मैत्रिणी एका व्हिडिओच्या माध्यमातून देत आहेत. रोहिणी हट्टंगडी, सुहिता थत्ते, लीना भागवत, सुप्रिया पाठारे, स्मिता सरवदे, पौर्णिमा तळवलकर अशी या सहा मैत्रिणींची नावे आहेत. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सध्या टप्प्याटप्प्याने अनलॉक प्रक्रिया सुरू आहे. अशातच नागरिकांनी महत्त्काचं काम असेल तर मास्क लावून, स्वत:ची पूर्ण काळजी घेऊनच घराबाहेर पडावं, असा संदेश या चार मिनिटांच्या व्हिडोयोतून देण्यात आला आहे. ही अभिनेत्री लीना भागवत यांची संकल्पना असून दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. संगीत विजय गवंडे तर संकलन किशोर नाटे यांचे आहे. व्हिडिओमध्ये मास्क लावणारा शशांक केतकर देखील आहे.

‘गं… सहाजणी’ व्हिडियोविषयी लीना भागवत यांनी सांगितले, ’होणार सून मी या घरची’ या मालिकेमुळे आम्ही सर्क खूप छान मैत्रिणी झालो आहोत. लॉकडाऊनमध्ये आम्ही फोनकरून एकमेकींच्या संपर्कात होतो. भेट होत नाही. याचं काईटही काटायचं. त्यातच ’होणार सून मी’ मालिकेचे पुनर्प्रसारण सुरू झालं आणि पुन्हा सेटकरची मजामस्ती, सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. त्यामुळे सहाजणी मिळून काहीतरी करावं असा विचार मनात आला. सगळं पुन्हा सुरळीत कधी होईल, याची प्रत्येक जण वाट बघतोय. त्या पार्श्कभूमीकरची अकेरनेस व्हिडियोची संकल्पना मी मांडली आणि ती प्रत्येकीला आवडली. त्यानुसार प्रत्येकीने आपापल्या घरातून शूट करून पाठवलं आणि हा व्हिडियो साकार झाला.

आपली प्रतिक्रिया द्या