बीडच्या प्रशासनाने नाट्यगृहात घेतली स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक; सोशल डिस्टन्सची ऐशी की तैशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी सरकार जनतेला सतत आवाहन करत असताना प्रशासन कसे बेफिकीरपणे वागत आहे, याचा प्रत्यय बीड मध्ये आले आहे. बीड प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानदारांची थेट नाट्यगृहात बैठक घेतली. या बैठकीला दुकानदार आणि शिक्षकाची तोबा गर्दी झाली होती. जवळपास सहाशे ते सातशे लोक या ठिकाणी एकत्र आले होते. सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी कोणतीही उपाय योजना करण्यात आली नव्हती.

स्वस्त धान्य दुकानातून ए पी एल धारकांना धान्य वाटण्यासह इतर सूचना देण्यासाठी आज बीड च्या नाट्यगृहात प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक च घेतली या बैठकीला बीड तालुक्यातील साडेतीनशे धान्य दुकानदार अन तेवढेच शिक्षक उपस्थित होते. अत्यावश्यक सुविधे मध्ये येणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांना सूचना देण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र या नाट्यगृहात सोशल डिस्टन्सची पार वाट लागली होती. जेम तेंम एक हजार खुर्च्यांची क्षमता असणाऱ्या नाट्यगृहात चांगलीच गर्दी झाली होती. सोशल डिस्टन्सची ऐशी की तैशी प्रशासनानेच केल्याने सर्व काही आलबेल आहे.