ठाण्यातील जांभळीच्या 400 भाजी विक्रेत्यांचे सेंट्रल मैदानात होणार स्थलांतर

643

कोरोना व्हायरसचा प्रार्दभाव रोखण्यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आणखी एक पाऊल उचलण्यात आले आहे. जांभळी नाक्यावरील भाजी मंडईची गर्दी टाळण्यासाठी आता येथील 400 भाजी विक्रेते, फळ विक्रेते आदींचे सेंट्रल मैदानात स्थलांतर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. बुधवारपासून या ठिकाणी त्यांना आपला व्यावसाय करता येणार आहे. पहाटे पाच ते सकाळी 10 वाजेर्पयतच हे मार्केट सुरु राहणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. याठिकाणी सोशल डिस्टेंट राखला जाणार आहे.

जांभळी नाका ते स्टेशन र्पयत आणि जांभळी नाक्यावरील दोन भाजी मंडईत होणारी गर्दी ही रोजचीच झाली आहे. नागरीकांना कितीही सोशल डिस्टेंट पाळा असे आवाहन करण्यात आले असले तरी आणि गर्दी करु नका असे सांगण्यात आले असले तरी नागरीक काही ऐकत नसल्याचेच दिसत होते. त्यापाश्र्वभूमीवर सोमवारी सकाळी येथील भाजी विक्रेते, फळ विक्रेते व इतर व्यापा:यांबरोबर महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी, सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड, लोकशाही आघाडीचे गटनेते नजीब मुल्ला, ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ट पोलीस निरिक्षक सोमवंशी आदींची एक बैठक पार पडली. त्यामध्ये कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर खबरदारी म्हणून येथील सर्व भाजी विक्रेत्यांचे तात्पुरत्या स्वरुपात सेंट्रल मैदान येथे स्थलांतर करंण्यावर एकमत झाले. त्यानुसार आता येत्या बुधवार पासून सेंट्रल मैदानात 400 भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि इतर व्यापारी आपल्या व्यावसाय करणार आहेत. त्यानुसार आता त्याठिकाणी मार्कींगचे काम युध्द पातळीवर सुरु करण्यात आल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली. तर याठिकाणचे दोन रस्तेही सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून बंद करण्यात येणार असल्याची माहिती अधिकारी यांनी दिली.

सेंट्रल मैदानात सोशल डिस्टेंटचे पालन केले जाणार असून 400 विक्रेते आता बुधवार पासून आपला व्यावसाय करणार आहेत. पहाटे पाच ते 10 या वेळेतच या ठिकाणी व्यावसाय करता येणार आहे. त्यामुळे नागरीकांनी देखील या ठिकाणी सोशल डिस्टेंट ठेवून गर्दी करु नये असे आवाहन देखील पालिकेने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या