व्हर्च्युअल ट्रॅव्हलिंगचे जग! घरात बसून करा विश्वाची सफर

कोरोनामुळे यंदा सर्वांनाच घरात थांबावे लागत आहे. जगभरातील लोकांचे हिंडणेफिरणे थांबले आहे. फेडरेशन ऑफ असोसिएशन इन इंडियन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी या संघटनेच्या मते त्यांच्या क्षेत्राचे 15 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशातच काही ट्रव्हल कंपन्या व्हर्च्युअल ट्रव्हलिंगची नवीन संकल्पना घेऊन आल्या आहेत. व्हर्च्युअल ट्रव्हलिंग म्हणजे घरात बसून देशाची-जगाची सफर करणे. आपल्या मोबाईल, स्मार्ट टिव्ही, लॅपटॉपच्या माध्यमातून जगाच्या कोणताही स्थळाचे लाईव्ह ह्यू बघायचे. त्यासाठी गाईड आपल्याला डिजिटली मार्गदर्शन करतो.

कसा कराल आभासी प्रवास

ऑनलाईन व्हिजिटर बनून आपण आभासी प्रवास करू शकतो. कोरोना काळात ही नवी संकल्पना उदयास आली आहे. त्यासाठी भरपूर मोबाईल अॅप आणि वेबसाईटस उपलब्ध आहेत. अॅप डाऊनलोड करून किंवा वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करून आभासी प्रवासाचा आनंद घेता येतो. अनेक पर्यटनस्थळांसोबत म्युझियम, पार्क यांना भेट देता येते.

पाच नवीन प्रकार

  • डिस्ने वर्ल्डच्या वतीने व्हर्च्युअल ट्रव्हलिंगची सेवा उपलब्ध आहे. यातून लहान मुलांच्या डिजिटल टुर घडवता येतील. डिस्ने वर्ल्डच्या वेबसाईटवर साईन अप करून व्हर्च्युअल ट्रव्हलिंग करता येईल.
  • लंडनच्या ब्रिटीश म्युझियमसह अनेक म्युझियमला ऑनलाईन भेट देता येईल. तिथे उपस्थित असलेले गाईड वेबकॅमच्या माध्यमातून आपल्याला सर्व माहिती देऊ शकतात. ट्रव्हेल लेझर या टुर कंपनीच्या वेबसाईटवर ही सुविधा उपलब्ध आहे.
  • गुगल स्ट्रीट ह्यूच्या माध्यमातून आपण जगातील कोणतेही मार्केट किंवा टुरिझम साईटला घरात बसून भेट देऊ शकतो. त्यासाठी फक्त मोबाईल पह्न आणि इंटरनेटची गरज आहे.
  • व्हीआर ट्रव्हलिंगचे अनेक मोबाईल ऑप्लिकेशन उपलब्ध आहेत. ते अॅण्ड्रॉईड किंवा आयओएसवर डाऊनलोड करता येते. डाऊनलोड केल्यानंतर थ्रीडीमध्ये 10 हजार पर्यटन स्थळांना व्हर्च्युअली जाता येते.
  • अनेक वेबसाईटसच्या माध्यमातून हॉटेल, प्राणिसंग्रहालय, पार्क यांची ऑनलाईन टूर करता येते. अगदी कमी खर्चात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते.

अॅप आणि वेबसाईटस

गुगल कार्ड बोर्ड, एस्केप व्हीआर, यू-व्हिजिट, व्हीआर, क्वांटस हे प्रसिद्ध ट्रव्हलिंग अॅप आहेत. एअरपॅनो, नासा, 7 वंडर्स, अॅक्रोपोलिस, अॅमेझॉन एक्सप्लोर हे ऑनलाईन ट्रव्हलिंगचे अॅप, वेबसाईट आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या