पालिकेतील कोरोनाबाधित कर्मचार्‍यांची माहिती जाहीर होणार

681
सर्व फोटो - संदीप पगडे

पालिकेतील कोरोनाबाधित पालिका कर्मचार्‍यांची माहिती आता वेळोवेळी जाहीर केली जाणार आहे. प्रत्येक खातेप्रमुख आपापल्या विभागातील कोरोनाबाधित कर्मचार्‍यांची माहिती जाहीर करणार आहेत. अशी आकडेवारी खातेप्रमुखांनी जाहीर करावी असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे सह आयुक्त मिलिन सावंत आणि प्रमुख कामगार अधिकारी सहदेव मोहिते यांनी परिपत्रक काढून दिले आहेत.

पालिका मुंबई आणि उपनगरात अत्यावश्यक सेवा देण्याचे काम पार पाडते. सद्यस्थितीत बृहन्मुंबई क्षेत्रामध्ये कोरोना या रोगामुळे दिवसेंदिवस अधिक रुग्ण सापडत आहेत व त्यांच्यावर उपचार करण्याचे काम सुरु आहे. मात्र खाते, विभाग आणि रुग्णालय स्तरावर महापालिका कर्मचारी कोरोना या रोगामुळे बाधित आणि मृत्यू होत आहेत. मात्र पालिका कोरोनाबाधित कर्मचार्‍यांची माहिती जाहीर करीत नसल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी करीत तक्रार केली होती. पालिका प्रशासन ही आकडेवारी लपवत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. अनिल गलगली यांच्या मागणीनंतर सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जारी केले आहे. पालिकेतील करोना बाधित अधिकारी व कर्मचार्‍यांची माहिती देण्याची जबाबदारी आता खातेप्रमुखांची आहे.

आपली प्रतिक्रिया द्या