तबलीगी जमातने कोरोना देशभरात पसरवला, संपर्कात आलेल्या 400 जणांना लागण

1646

दिल्लीमधील निजामुद्दीन परिसरात तबलीगी जमात या संघटनेच्या वतीने तबलीगी जमात हा कार्यक्रम घेण्यात आला होता. कार्यक्रमासाठी देशाच्या विविध भागातून तसेच विदेशातून देखील मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. कार्यक्रमातील काही जण हे आधीच कोरोनाबाधित होते. त्यातील काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच या कार्यक्रमात जे सहभागी झाले होते आणि त्यांच्या जे लोक संपर्कात आले होते अशा तब्बल 400 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘दै. भास्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीतील कार्यक्रमात जवळपास 9 हजार लोक सहभागी झाले होते. दिल्लीतील निजामुद्दीन येथे आयोजित या परिषदेत सहभागी झालेल्या आणि जमातचे कार्यकर्ते अशा 9 हजार जणांची ओळख पटविण्यात गृहमंत्रालयाला यश आले आहे. यात 1306 जण विदेशी नागरीक असून त्या सगळ्यांना क्लारंटाइन करण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली.

जमातच्या कार्यक्रमात गेलेले आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्यासाठी देशभर मोहिम राबविण्यात आली होती. त्यांच्या टेस्ट करण्यात आल्या असून त्यांच्यामुळे 400 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्र मधूनही 1400 लोक गेले होते. त्यापैकी 1300 जणांची ओळख पटवून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. इतरांची शोधमोहीम सुरू आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या