बुलढाणा – आज प्राप्त अहवालांपैकी 41 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; एक पॉझिटिव्ह

591

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी शुक्रवारी प्राप्त 42 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 41 अहवाल निगेटिव्ह असून एक अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. पॉझिटिव अहवाल हा चांदुर बिस्वा ता. नांदुरा येथील 21 वर्षीय तरुणाचा आहे. आतापर्यंत 861 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 36 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. आतापर्यंत 24 कोरोनाबधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 24 आहे. सध्या रूग्णालयात 09 रूग्ण कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच शुक्रवारी 42 अहवाल प्राप्त झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या