हिंगोलीत एक कोरोना पॉझिटिव्ह

2050

हिंगोली येथील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल एका 49 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी 2 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असुन कोरोनाचा शिरकाव हिंगोली जिल्ह्यात झाला आहे.

31 मार्च रोजी एका 49 वर्षीय व्यक्तीला कोरोना संशयित म्हणून दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सुरू होते. हा कोरोना रुग्ण कोरोनाग्रस्ताच्या जवळून संपर्कात आल्याचे सांगण्यात आले आहे. या संशयित रुग्नाच्या थ्रोट स्वाबचे नमुने संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या तपासणीचा चाचणी अहवाल हिंगोलीच्या आरोग्य यंत्रनेला आज दुपारी चार वाजता प्राप्त झाला असुन हा 49 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित झाल्याचे चाचणीत पुढे आले आहे.तर अन्य एका 11 वर्षीय मुलीचा तपासणी अहवाल प्रलंबित आहे.

आपली प्रतिक्रिया द्या