आरटी-पीसीआर चाचणी दर एकसमान 400 रुपये करा, सर्वोच्च न्यायालयाची केंद्र व राज्यांना नोटीस

supreme_court_295

कोरोनाचे निदान करण्यासाठी करण्यासाठीच्या कार्यपद्धती सुसूत्रता आणण्यात यावी. देशभरात आरटी-पीसीआर चाचणीचे दर एकसमान 400 रुपये करण्यात यावे. यासंदर्भात दोन आठवडय़ांत उत्तर देण्यात यावे, अशी नोटीस सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारसह राज्यांना नोटीस पाठवली आहे.

कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱया आरटी-पीसीआर चाचणीचे दर वेगवेगळे आहेत. देशात हा दर एकसमान करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका दाखल पेशाने वकील असलेल्या अजय अग्रवाल यांनी दाखल केली आहे. देशभरात आरटी-पीसीआर चाचणीचे दर 400 रुपये निश्चित करावेत. त्यामुळे कोरोना चाचण्यांमध्ये वाढ होऊन लोकांनाही फायदा होईल असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली खंठपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीनंतर न्यायालयाने केंद्र व राज्यांना नोटीस पाठवून आरटी-पीसीआर चाचणीच्या एकसमान दरांबद्दल विचारणा केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या