रत्नागिरीत कोरोनाबाधित शून्य! त्या पॉझिटिव्ह रूग्णाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह

459

रत्नागिरीत कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडला होता. त्याच्यावर उपचारानंतर पुन्हा त्याचा रक्ताचा नमुना पुण्यात तपासणीसाठी पाठवला असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याची कोरोना बाधित रूग्णांची संख्या शून्यावर आली आहे. अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

19 मार्च रोजी रत्नागिरीत कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडला होता.52 वर्षांची एक व्यक्ती दुबईहून गुहागर तालुक्यांतील शृंगारतळी येथे आली होती.त्यांना कोरोनाची लक्षण सापडल्याने त्यांना रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांचा स्वॅप पुण्यात तपासणीसाठी पाठवला असता तो पॉझिटिव्ह आला होता.त्यानंतर उपचारानंतर पुन्हा स्वॅप तपासणीसाठी पाठवला असता तो निगेटिव्ह आला आहे.

तर जिल्हा रूग्णालयाचे रूपांतर कोरोना रूग्णालय

रत्नागिरीत कोरोनाचा आकडा शून्यावर आला आहे मात्र तो तसाच ठेवायचा आहे.मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास जिल्हा शासकीय रूग्णालयाचे कोरोना रूग्णालयात रूपांतर करणार आहोत.त्यासाठी तीनशे-साडेतीनशे बेड तयार ठेवण्यात आले आहेत.जिल्हा रूग्णालयातील 69 डॉक्टर,आरोग्य केंद्रातील 126 डॉक्टर,ओपीडी पहाणारे 491 डॉक्टर,स्वयंसेवी संस्थांचे 256 डॉक्टर,वैद्यकीय महाविद्यालयातील 72 डॉक्टर सेवेसाठी उपल्बध रहाणार आहेत असे सामंत यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा,अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी के.एच.बघाटे,नगराध्यक्ष प्रदीप साळवी व इतर उपस्थित होते.

शिवभोजनची संख्या पाचपट करणार-जिल्हाधिकारी मिश्रा

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शिवभोजन सुरु करणार आहे.शिवभोजनांची संख्या पाचपट करणार आहे.ज्या कामगारांची जेवणाची आणि रहाण्याची व्यवस्था करण्यात आली.जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या असून संचारबंदीची कड़क अमलबजावणी करण्यात येत आहे.अपप पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी सांगितले की संचारबंदीच्या काळात 33 गुन्हे दाखल करण्यात आले असून 7 एनसी दाखल आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या