टाटा समुहात पहिल्यांदाच पगार कपात

1501

कोरोना लॉकडाऊनचा फटका देशातील बलाढ्य उद्योग समूह असलेल्या टाटा ग्रुपलाही बसला आहे. त्यामुळे टाटा समुहातील टॉप मॅनेजमेंटमध्ये सर्व सीईओ, एमडी यांच्या पगारात 20 टक्के कपात केली आहे. टाटा समुहाच्या इतिहासात पहिल्यांदाच ही पगार कपात आहे.

कर्मचाऱयाच्या हिताचे रक्षण करणे ही टाटा समुहाची संस्कृती आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सीईओ, एमडी यांच्या वेतनात कपात केली आहे. टाटा कंन्सल्टसी सर्व्हिसेसचे सीईओ राजेश गोपीनाथन यांच्यासह टाटा सन्स, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा पॉवर, टाटा इंटरनॅशनल, टायटन, टाटा कॅपिटल, इंडियन हॉटेल्स, वोल्टासचे सीईओ 20 टक्के कमी पगार घेणार आहेत. चालू आर्थिक वर्षातील बोनसमध्येही कपात होईल.

आपली प्रतिक्रिया द्या