सगळ्या गोष्टींचं खासगीकरण करून, देश विकण्याचं काम सध्या सुरू आहे; अरविंद सावंत यांची केंद्र सरकारवर टीका

सगळ्या गोष्टींचं खासगीकरण करून, देश विकण्याचं काम सध्या सुरू आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. नवी दिल्लीत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

अरविंद सावंत म्हणाले आहेत की, “सगळ्या गोष्टींचं खासगीकरण, देश विकण्याचं काम सुरू आहे. जागतिक पातळीवर आपली भयावह नाचक्की होत आहे. विभंजनकारी विचारांनी देश नासवला जात आहे. महागाई, बेरोजगारीला मर्यादा नाही, शाश्वत नोकर्‍या नाहीत, पब्लिक सेक्टर उध्वस्त केला जात आहे.”

ते म्हणाले आहेत की, “बिनविरोध निवडून येण्याचे नवीन प्रकार सुरू झाले आहे. धाक, पैसा, कोणी पोलीस वैगरे काही मनात नाही. आमची सत्ता आहे, बस. आम्ही म्हणून म्हणू ते.. तो बिनविरोध तर बिनविरोध. अशा पद्धतीने सगळं सुरू आहे. म्हणजेच काय तर, एका वाक्यात देशाच्या संविधानाशी खिलवाड आहे.”