विमानांवर वापरला जाणारा कंट्री कोड बदला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान स्वतंत्र होऊन सात दशके झाली तरी देशातील विमानांवर व्हीटी (व्हिक्टोरियन किंवा व्हाइसरॉय टेरिटोरी) हा कंट्री कोड वापरला जातो. हा कंट्री कोड बदलण्यात यावा अशी मागणी करत उद्योजक विजयपथ सिंघानिया यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. व्हीटी ऐवजी बीएच (भारत), आयएन (इंडिया) किंवा एचएन (हिंदुस्थान) हे कंट्री कोड वापरण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.

नेपाळ, फिजी, पाकिस्तान, श्रीलंका आणि भूतान अशा अनेक देशांनी स्वातंत्र्यानंतर विमानावरील कंट्री कोड बदलला आहे. मात्र हिंदुस्थानने अद्याप ब्रिटिशांकडून मिळालेला व्हीआय हाच कंट्री कोड कायम ठेवला आहे. तो बदलण्यात यावा अशी मागणी सिंघानिया यांच्यासह पुण्यातील उद्योजक विजय सेठी यांनी केली आहे.