डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय न्यायालयाने बदलला

डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाने जोरदार झटका दिला आहे. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या गव्हर्नर लिसा कुक यांना पदावरून हटवण्याचे आदेश दिले होते, परंतु आता अमेरिकेतील अपीलीय कोर्टाने हा निर्णय रद्द केला आहे. लिसा कुक यांना पदावरून हटवण्यासाठी ट्रम्प प्रशासनाला आता सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. फेडरल रिझर्व्ह हे स्वतंत्र आहे. यात सरकार हस्तक्षेप करत नाही. फेडरल रिझर्व्ह एजन्सीच्या 112 वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही राष्ट्राध्यक्षाने फेडरल रिझर्व्ह गव्हर्नरला पदावरून हटवले नाही.