जम्बोकिंगचा उपक्रम, गरजूंपर्यंत पदार्थांचे वाटप

203

चोवीस तास जागे असणारे शहर अशी मुंबई शहराची ओळख आहे. एकीकडे अनेक प्रोफेशनल्सना घरून काम करण्यास परवानगी दिली असली तरी ज्या कामांसाठी प्रत्यक्ष उपस्थित असण्याची गरज आहे, अशा मजुरांना व कामगारांना घरून काम करणे शक्य नाही. कोरोनाव्हायरसवर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पण त्यांच्या प्रयत्नांना सहकार्य करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. हे ओळखून जम्बोकिंगतर्फे गरजूंना पदार्थांचे मोफत वाटप करण्यात येत आहे. यासाठी त्यांनी एशिअन हार्ट इन्स्टिट्यूट आणि केट्टो (हा एक हिंदुस्थानी क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म असून या माध्यमातून व्यक्ती आणि एनजीओंना सामाजिक कार्यसासाठी निधी उभारता येतो) यांच्या सहयोगाने #JoyofGivingwithJumboking कॅम्पेन सुरू करण्यात आले आहे. ज्यांना शहरातील गरजूंच्या पोटापाण्याची सोय करायची आहे ते रु.12/- देऊन अन्नदान करू शकतात.

उदाहरण म्हणजे तुम्ही केट्टो #JoyofGivingwithJumboking आणि एशियन हार्ट इन्स्टिट्यूट अभियानावर रु.120 रुपयांची देणगी दिली तर जम्बोकिंग तुमच्यातर्फे 10 लोकांचे पोट भरू शकेल. तुम्ही दान केलेले बर्गर्स रॉबिनहूड आर्मी घेईल आणि शहरातील गरीब वस्त्यांमध्ये त्याचे वाटप करण्यात येईल. रॉबिनहूड आर्मी ही सेवाभावी कार्यकर्त्यांचे एनजीओ नेटवर्क आहे. या नेटवर्कतर्फे कोरोनाच्या प्रसाराला प्रतिबंध घालण्यासाठी स्वच्छतेचे नियम पाळण्यात येतात.

“प्रत्येकालाच आपला खारीचा वाटा उचलायचा आहे. पण तो कसा उचलावा हे कदाचित त्यांना माहीत नसते. छोट्यात छोटे योगदानसुद्धा महत्त्वाचे आहे! आमच्या पदार्थ वाटप अभियानाच्या माध्यमातून हातावर पोट असलेले कामगार, घरकाम करणारे नोकर, बांधकाम कामगार, मजूर, रिक्षा ओढणारे, फुगेविक्रेते इत्यांदींपर्यंत पोहोचण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. कोव्हिड 19 लॉकडाऊनमुळे पुढील किमान काही आठवडे यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी उत्पन्नाची साधनेच उपलब्ध नसतील.’, असे जम्बोकिंग फुड्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक धीरज गुप्ता म्हणतात.

“अशा बिकट परिस्थितीत, आपल्यापैकी प्रत्येकाने अजून एका व्यक्तीचे पोट भरण्याची जबाबदारी घेतली तर आपण या परिस्थितीतून बाहेर पडू शकू.”, असे फिलान्थ्रॉपिस्ट आणि विचारवंत डॉ. रमाकांत पांडा म्हणतात. मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूट नेहमीच धर्मादाय प्रयत्नांमध्ये आघाडीवर असते. एशियन हार्ट इन्स्टिट्यूटने #JoyofGivingwithJumboking अभियानाचा भाग म्हणून या आधीच मुंबईत 40,000 जम्बोकिंग्सचे वाटप करण्याचा निर्धार केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या