Covid -19 च्या काळात फेसबुकवर आला नवा इमोजी, पहा काय आहे खास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. अशा काळात मानसिक आधारही तितकाच आवश्यक आहे हे लक्षात घेऊन विविध पर्याय, उपाय शोधले जात आहेत. फेसबुकने देखील यात पुढाकार घेतला असून संकटाच्या वेळी सहकार्य आणि सहानुभूती व्यक्त करण्यासाठी फेसबुकने ‘केअर इमोजी’ आणला आहे.

फेसबुक वरील लिखित पोस्ट, फोटो किंवा व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना काळजी आणि सोबत असल्याची भावना दर्शविण्यासाठी शॉर्टहँड म्हणून हा इमोजी तयार करण्यात आला आहे.

care-emoji

हा हृदयाला घट्ट मिठी मारणारा एक इमोजी आहे, तर मेसेंजर अ‍ॅपमध्ये ते स्पंदन जाणवणारं ‘जांभळं हृदय’ म्हणून दिसेल. फेसबुकने आपल्या अधिकृत संदेशात “आम्हीही या काळातही एकत्र, आपल्या सोबत आहोत.” हे दर्शवण्यासाठी हा इमोजी आणल्याचं म्हटलं आहे. या इमोजीसाठी मोबाईल अ‍ॅप्सवरील लाईक बटण वापरावे लागेल तर डेस्कटॉपवर लाईक बटणावर करसर फिरवावा लागेल. या इमोजीचा वापर नागरिकांचे मनोबल वाढवेल, असेही सांगितले जात आहे.