
गेल्या आठवड्यान पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया सोडण्याचा मान व्यक्त केला होता. परंतु सोशल मीडिया सोडणार नसून महिला आपले सोशल मीडिया प्रोफाईल हाताळणार असल्याचे सांगितले होते. आता पंतप्रधान मोदींनी होळी खेळणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्याचे कारणही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. हिंदुस्थानातही कोरोनाचे अनेक रुग्ण आढळले आहेत. त्याची खबरदारी म्हणून पंतप्रधान मोदी होळीच्या कार्यक्रमला अनुपस्थित राहणाअर आहेत. मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोना टाळण्यासाठी लोकांनी एकत्र जमू नये असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. म्हणून या वर्षी मी कुठल्याही होळीच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
Experts across the world have advised to reduce mass gatherings to avoid the spread of COVID-19 Novel Coronavirus. Hence, this year I have decided not to participate in any Holi Milan programme.
— Narendra Modi (@narendramodi) March 4, 2020
पंतप्रधान मोदींच्या पाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही होळी न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. होळी हा हिंदुस्थानमधील महत्त्वाचा सण आहे. परंतु कोरोना व्हायरसमुळे मी कुठल्याही होली मिलनच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही असे त्यांनी म्हटअले आहे. तसेच नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात एकत्र येऊ नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
Holi is a very important festival for we Indians but in the wake of Coronavirus, i have decided not to participate in any Holi Milan celebration this year.
I also appeal everyone to avoid public gatherings and take a good care of yourself & your family.
— Amit Shah (@AmitShah) March 4, 2020
हिंदुस्थान फिरण्यासाठी आलेल्या इटलीच्या 14 पर्यटकांना Cornavirusची लागण झाली आहे. दिल्लीतील AIIMS रुग्णालयाने या माहितीला दुजोरा दिला आहे. राजस्थानातील जयपूर इथे इटलीवरून आलेल्या जोडप्यातील पुरुषालाही या आजाराची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याच्या बायकोलाही या आजाराची लागण झाल्याचा संशय असून तिचे नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या जोडप्याला सवाई मानसिंह रुग्णालयात वेगळं ठेवण्यात आलं आहे. हे जोडपं इटलीवरून आलेल्या पर्यटकांच्या गटामधलेच आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की सर्व कोरोना बाधितांना ITBP च्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तसेच दिल्लीतील सर्व रुग्णालयांना चांगल्या दर्जाचे वॉर्ड बनवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जेणेकरून राजधानीत कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता यावा.
हैद्राबादमधील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाची तब्येत सुधारत आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सदर रुग्णाची तब्येत खालवल्याची तसेच त्याचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
चीनच्या वुहान या शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरामध्ये कहर केला आहे. अनेक देशांमध्ये पसरलेला कोरोना व्हायरसची हिंदुस्थानमध्ये एन्ट्री झाली असून दिल्लीनंतर आग्रामध्येही काही रुग्ण आढळून आले होते.

























































