
देशातील कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील कोविड-19 चाचणीच्या धोरणात मोठा बदल केला आहे. याआधी डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन शिवाय लोकांना आपली कोरोना चाचणी करून घेता येत नव्हती. मात्र, आता जर कुणाला कोरोना टेस्टिंग करून घ्यायची असेल, तर यासाठी डॉक्टरच्या प्रिस्क्रीप्शनची गरज लागणार नाही.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड-19 टेस्टिंग संदर्भातील अॅडव्हायझरीमध्ये काही बदल केले आहेत. ज्यानुसार लोकांना ऑन-डिमांड टेस्टिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे आता डॉक्टरच्या प्रिस्क्रीप्शन शिवाय कोविड-19 चाचणी करता येणार आहे. याशिवाय ज्या व्यक्ती प्रवास करीत आहेत आणि आपली चाचणी करून घेऊ इच्छित आहेत. तेदेखील ऑन-डिमांड कोविड -19 चाचणी करून घेऊ शकतात.

























































