दिलासादायक! राज्यात बाधितांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेले दोन दिवस राज्यातील कोरोनाचे चित्र दिलासादायक आहे. गुरुवारी राज्यात 42,582 नवे कोरोनाबाधित आढळले होते. तर 54,535 रुग्णांना डिस्चार्ज दिला होता. आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत अजून घट झाली.

आजच्या आकडेवारीनुसार राज्यात 39,923 नवे रुग्ण सापडले तर 53,249 जण बरे होऊन घरी गेले. राज्याचा रिकव्हरी रेट आता 88.68 टक्क्यांवर गेला आहे.

राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 53 लाख 9 हजार 215  इतका झाला असला तरी त्यातील 47 लाख 7 हजार 980 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.