
कोरोना व्हायरसच्या ओमायक्रोन व्हेरिएंटपासून बचाव करायचा असेल तर बुस्टर डोस घेणे आवश्यक असून तरच आपण कोरोनाच्या चौथ्या लाटेपासून वाचू शकतो, असे तज्ञांनी म्हटले आहे. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्र्ाज्ञांच्या मते सार्स कोविड वेरिएंटच्या विरोधात व्हॅक्सिनच्या प्रभावाचा अभ्यास केला गेला. त्यावेळी ओमायक्रोनच्या घातक व्हेरिएंट ‘बीए-2’ शी टक्कर देण्यासाठी कोरोना व्हॅक्सिनचा बुस्टर डोस घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनचा डोस घेतलेल्या लोकांमध्ये अॅण्टीबॉडीची पातळी सहा महिन्यांनंतर घटू लागते. तसेच कोव्हॅक्सिनसुद्धा ओमायक्रोनच्या विरोधात मर्यादित सुरक्षा देते, ज्याला म्युटेशनच्या कारणांनी अॅण्टीबॉडीची क्षमता प्राप्त झाली आहे.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजीच्या तज्ञांनी कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड दोन्ही लसींचा अभ्यास केला. अभ्यासानंतर असा संकेत मिळत आहे की, लोकांना पात्र होताच त्यांना बुस्टर डोस देणे गरजेचे आहे. कोरोना व्हायरसच्या ओमायक्रोन व्हेरिएंटच्या प्रकरणात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि दोन्हींच्या मिश्रण असलेले डोस घेतल्यानंतर अॅण्टीबॉडीची पातळी सहा महिन्यांनंतर घटू लागते. त्यामुळे त्यापासून वाचण्यासाठी बुस्टर डोस गरजेचा आहे. कोव्हिशिल्डचा अभ्यास केला असता डोस घेतलेल्यांमध्ये निर्माण झालेली अॅण्टीबॉडी नष्ट करण्याची क्षमता ओमायक्रोनमध्ये आहे.



























































