चंद्रपूर जिल्ह्यात कोविशील्ड लस पोहचली

चंद्रपूर जिल्ह्यात कोविशील्ड लस पोहचली आहे. नागपूरातून मध्यरात्री हा लसीचा साठा चंद्रपुरमध्ये पोहचला. जिल्हा परिषदेच्या वातानुकूलित साठवण कक्षात हा साठा ठेवण्यात आला आहे. 20 हजार लसींची ही पहिली खेप जिल्ह्यातील 16 हजार 524 वैद्यकीय कोरोना योद्ध्यांना सर्वप्रथम दिली जाणार आहे.

लसीच्या वितरणाची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे आहे. आजपासून जिल्ह्यातील 8 केंद्रांवर ही लस पोहचविली जाणार असून 16 जानेवारीला आरोग्य विभागाने एकत्र केलेल्या माहितीनुसार एमएसएस पाठवलेल्या सर्वांना ही लस टोचली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या