चार सेकंदांत कोसळली स्मशानभूमीची भिंत

हरयाणाच्या गुरुग्राममध्ये मदनपुरी येथील स्मशानभूमीच्या मागील गेटची भिंत अचानक कोसळली. या भिंतीजवळ बसलेले 6 जण त्याखाली गाडले गेले. ढिगाऱयाखाली दबल्याने दोन मुलींसह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आज सकाळी मृतांच्या संतप्त नातेवाईकांनी सुधार समिती व्यवस्थापनाविरोधात रास्ता रोको केला.