आता रेडिओवर पुन्हा एकदा ऐकायला मिळणार कॉमेंट्री, हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका मालिकेने श्रीगणेशा

442

एक काळ होता जेव्हा हिंदुस्थानात टेलिव्हिजन हा प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचला नव्हता. त्यावेळी रेडिओवरील क्रिकेट कॉमेंट्री कानाकोपर्‍यात ऐकू येत असे. रेडिओवरील तोआवाज ऐकून हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींच्या हृदयाचे ठोके चुकायचे. कधी पराभवाचे दुःख, तर कधी विजयाचा आनंदही तोचआवाज ठरवायचा. मात्र टेलिव्हिजन घरोघरी आल्यानंतर रेडिओवरील कॉमेंट्रीची क्रेझकाहीशी कमी झाली. त्यामुळेच याला फुलस्टॉप देण्यात आला. पण आता बीसीसीआयने आकाशवाणीसोबत (एअर) दोन वर्षांचा करार केला असून 15 सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या हिंदुस्थानदक्षिण आफ्रिका या मालिकेने याचा श्रीगणेशा होणार आहे. क्रिकेटप्रेमींसाठी ही खूशखबर असणार आहे. त्यामुळे आता रेल्वे, बस, एसटी, रिक्षा, टॅक्सी, पानाच्या टपरीवर पुन्हा एकदा रेडिओ कॉमेंट्री ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटणार नाही.

बीसीसीआयने आकाशवाणीसह दोन वर्षांचा करार केला असून याची सुरुवात 10 सप्टेंबर 2019 पासून होत आहे. 31 ऑगस्ट 2021 सालापर्यंत हा करार कायम राहणार आहे. या दोन वर्षांमध्ये हिंदुस्थानच्या आंतरराष्ट्रीय लढतींपासून स्थानिक स्पर्धांमधील लढतींचाही समावेश असणार आहे. पुरुष तसेच महिला क्रिकेट स्पर्धांमधील लढतीचीही कॉमेंट्री यावेळी रेडिओवर ऐकायला मिळणार आहे हे विशेष. 15 सप्टेंबर रोजी हिंदुस्थानदक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये ट्वेण्टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या लढतीपासून या नव्या कराराचा श्रीगणेशा होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या