कपिल दा बनले ‘गोल्फ चॅम्पियन’

365

1983 चे क्रिकेट विश्वविजेतेपद हिंदुस्थानला मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारे माजी कर्णधार कपिल देव यांनी एव्हीटी टूर गोल्फ स्पर्धेत 60 ते 64 वयोगटाचे विजेतेपद पटकावून सर्वानाच एक गोड धक्का दिला. या स्पर्धेचे सर्वसाधारण जेतेपद सीमा सुरक्षा बलाचे पुष्पेंद्र सिंह राठोड यांनी पटकावले. या गोल्फ स्पर्धेत विविध वयोगटातील 10 शहरांतील गोल्फपटूंनी सहभाग घेतला होता. कपिल यांनी 100हून अधिक स्पर्धकांना मागे टाकत जेष्ठ गटात विजेतेपद पटकावले.

आपली प्रतिक्रिया द्या