
क्रिकेट ऑस्ट्रेलिया-चॅनेल 7 यांच्यामध्ये सुरू असलेला वाद गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. याचा फटका हिंदुस्थानच्या आगामी ऑस्ट्रेलियन दौऱयावर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून अद्याप या दौऱयाचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आलेले नाही अशी माहिती मीडियामधून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
‘चॅनेल 7 ’ या वाहिनीसोबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा करार करण्यात आलेला आहे. मात्र गेल्या वर्षी या कराराचा भंग करण्यात आल्याचा आरोप क्रिकेट लढतींचे प्रक्षेपण करणाऱया ‘चॅनेल 7’ या वाहिनीकडून यावेळी करण्यात आलेला आहे. ‘चॅनेल 7’ याविरोधात कायदेशीर कारवाईही करणार आहे. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून याबाबत कोणतीही सूचना करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या व ‘चॅनेल 7’ यांच्यासोबतचा वाद यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून हिंदुस्थानी दौऱयाचे वेळापत्रकही ठरवण्यात आलेले नाही.
चिंता नाही – टीम पेन
हिंदुस्थानचा संघ ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे. पण या महत्त्वाच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाचे महत्त्वाचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळताहेत. कसोटी मालिकेआधी त्यांना लाल चेंडूने लढत खेळायचा सराव मिळणार नाहीए. यावर ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघाचा कर्णधार टीम पेन म्हणाला, स्टीवन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स हे खेळाडू व्यावसायिक आहेत. आपला मोर्चा आयपीएलकडून कसोटीकडे वळवायला या खेळाडूंना वेळ लागणार नाही. त्यामुळे मला या गोष्टीची चिंता नाहीए.
शास्त्री, पुजारा, विहारी यांना विलगीकरणात रहावे लागणार
सध्या यूएईमध्ये आयपीएलचा थरार सुरू आहे. पण याप्रसंगी बीसीसीआयकडून हिंदुस्थानच्या ऑस्ट्रेलियन दौऱयाचे प्लॅनिंग सुरू झाले आहे. कोरोनाकडे लक्ष देता हिंदुस्थानी संघात ऑस्ट्रेलियन दौऱयासाठी 23 ते 25 खेळाडूंचा चमू पाठवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी या टेस्ट स्पेशालिस्टसह प्रशिक्षक रवी शास्त्राr व सपोर्ट स्टाफ यांना यूएईमध्ये सहा दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. हिंदुस्थानच्या संपूर्ण स्टाफला यूएईमधून ऑस्ट्रेलियाला नेण्याची योजना बीसीसीआयकडून तयार करण्यात येत आहे. हिंदुस्थानी संघाला चार्टर्ड फ्लाइटद्वारे यूएईतून ऑस्ट्रेलियाला नेले जाणार आहे.

























































