सिडनी, कॅनबेरामध्ये वन डे, टी-20 मालिका होणार

ऑस्ट्रेलिया देशामध्ये कोरोनासंबंधित कडक नियम आहेत. तेथील प्रत्येक राज्यामध्ये विलगीकरणासाठी वेगवेगळा कालावधी आहे. याच कारणामुळे हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील क्रिकेट मालिकेच्या वेळापत्रकावर अद्याप शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलिया व न्यू साऊथ वेल्स यांच्यामध्ये याबाबत चर्चा सुरू आहे. सर्व काही सुरळीत झाल्यास हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील टी-20 व वन डे मालिका सिडनी व कॅनबेरा येथे होतील. तसेच हिंदुस्थानी खेळाडूंना सिडनी येथे विलगीकरणात असतानाही सराव करता येणार आहे. हिंदुस्थानचा क्रिकेट संघ सुरुवातीला ब्रिस्बेन येथून मालिकेला सुरुवात करणार होता. पण क्वीन्सलॅण्ड राज्याचे कोरोनासंबंधित नियम कडक आहेत. तेथे हिंदुस्थानी संघाला विलीगीकरणात असताना सराव करता येणार नाही. त्यामुळे 14 दिवसांमध्ये त्यांना हॉटेलमध्येच राहावे लागणार होते, पण बीसीसीआयला हे मान्य नाही. त्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो असे काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे सिडनीचा पर्याय क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून पुढे आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या